Site icon Maharashtra Disha

प्रधानमंत्री पिक विमा योजना ( भारत सरकार व महाराष्ट्र शासनाची योजना, ए आय सी द्वारा लागू )

कशी फायद्याची आहे ही, योजना शेतकरी बांधवानसाठी ?

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस दुष्काळ अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते अश्या परिस्थितीत विमा योजना या शेतकऱ्यांना खूप फायद्याची ठरत आहे.

पिक विमा योजनेच्या प्रमुख बाबी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया ?

पिक विमा योजना पात्र शेतकरी कोण कोण असेल ?

कर्जदार शेतकरी :- प्रधान मंत्री पीक विमा योजना बिगर कर्जदार व कर्जदार शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे ऐय्छिक आहे. तथापि कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावयाचा नसेल तर त्यांनी आपल्या बँकेत या योजनेत सहभागाच्या अंतिम दिनांकाच्या ७ दिवस आधी विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे नाहीतर त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल.

बिगर कर्जदार शेतकरी :- बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पेरणी घोषणापत्र व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या सीएफसी केंद्रात, बँक शाखेत किंवा पिक विमा संकेतस्थळावर शेवटच्या तारखेच्या आधी जमा करावी.

भाडेपट्टी कराराने किंवा कुळाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेला भाडेपट्टी करार अपलोड करने  बंधनकारक असणार आहे.

शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना हप्ता किती असेल ?

फक्त १ रुपया प्रति अर्ज.

विमा संरक्षित बाबी

प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजेच विमा संरक्षित क्षेत्र जल्मय झाल्यास ढगफुटी झाल्यास वीज कोसळल्यामुळे लागणारे नैसर्गिक आग भूस्खलन गारपीट व  पिक काढणे पश्चात नुकसान भरपाई म्हणजेच चक्रीवादळ चक्रीवादळामुळे झालेला पाऊस व अवकाळी पाऊस या बाबी अंतर्गत किंवा सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांचे काढणीनंतर १४ दिवसांपर्यंत झालेला नुकसानीची पूर्व सूचना नुकसानीच्या ७२ तासाच्या आत कृषिरक्षक संकेतस्थळ, सहायता क्रमांक किंवा संबंधित बँक किंवा कृषी विभाग यांना द्यावी सदरची जोखीम केवळ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांनाच लागू आहे.

योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रात पीक कापणी प्रयोगाद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाची उभरता उत्पन्नाशी तुलना करून येणाऱ्या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सूचनेच्या अधीन राहून अधिसूचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

कधी पर्यंत प्रस्ताव दाखल करण्यात येतील ?

सी एफ सी व बँक केंद्रांमध्ये प्रधानमंत्री विमा योजना प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख आहे १५ जुलै २०२४ पर्यंत.

लवकरात लवकर बँक शाखा व सी एफ सी केंद्रांमध्ये जाऊन मुदतीच्या आधी प्रधानमंत्री पिक विमा योजना होईल याची खात्री म्हणजेच केंद्रांमध्ये शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळता येईल.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी ती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिलेली आहे किंवा जिल्हा किंवा तालुका विमा प्रतिनिधी कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधून माहिती घ्यावी.

योजनेच्या सर्व अटी व मार्गदर्शक सूचना लागू.

अधिक माहितीसाठी कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन नंबर वरती संपर्क साधावा.

हेल्पलाइन नंबर आहे १४४४७

Exit mobile version