यंदाही मिळणार गणेश भक्तांना टोल माफी …..
यंदा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना महामार्गावरून जाताना टोल माफी देण्यात येणार आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यात सर्वत्र गणपती चे आगमन आणि विसर्जन होणार असल्याकारणाने मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी व कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी तसेच मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी आरोग्य पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन देण्यात यावेत आणि गणेशोत्सव पर्यावरण पूरक व्हावा यासाठीचे निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी अधिकार्यांना दिलेले आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी गणेश भक्तांना यंदाही टोलमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
गणेशोत्सव निमित्त कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईचे शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना गेल्या वर्षी ज्याप्रमाणे परवानगी दिली होती तीच परवानगी यंदाही कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये असे आदेश दिलेले आहे आहेत. मंडळाने ज्या काही अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी योजना प्रत्येक महानगरपालिकेने राबवावी अशा सूचना आयुक्तना दिलेल्या आहेत.
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी रस्ते व्यवस्थित ठेवण्यासाठी खड्डे लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश दिलेले आहेत या कामांमध्ये जर हयगय केली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश सदरच्या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत.