मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

२०२४ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा २१ वर्षावरील महिलांसाठी केली आहे.

काय आहे ही योजना आता आपण जाणून घेऊया …..

महिलांच्या सशक्तीकरणासाठी मदत करणे: महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे.

शिक्षणासाठी प्रोत्साहन: मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती किंवा इतर प्रकारच्या शैक्षणिक सहाय्याचे वितरण.

संपत्ती निर्माण: महिलांना स्वयंसाहाय्य गटांच्या माध्यमातून उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

सुरक्षा आणि आरोग्य: महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवणे आणि आरोग्य सेवांसाठी सहाय्य पुरवणे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपल्या जवळच्या ग्रामपंचायत ,तहसील कार्यालयांमध्ये किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

वेबसाईट :- https://majhiladki.gov.in

काय असणार आहे या योजनेचा लाभ ‍‌‍‍‌? जाणून घ्या पुढीलप्रमाणे …..

  • वय २१ ते ६५ वर्षे.
  • दरमहा १५०० रुपये बँक खात्यात जमा होणार.
  • दरवर्षी महिलांसाठी ४६००० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार.

कोण कोण पात्र असतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी

  • महाराष्ट्र रहिवाशी असणाऱ्या २१ वर्षावरील महिला.
  • विवाहित, विधवा, घटस्पोटीत, अविवाहित , निराधार महिला.
  • लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न रुपये २ लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे.
  • महिलांचे वय 65 पेक्षा जास्त असता कामा नये.

अपात्र कोणकोण असेल

  • दोन लाख 50 हजार पेक्षा जास्त उत्पन्न असणारे.
  • घरात कोणी जर इन्कम टॅक्स भरत असेल तर.
  • सरकारी नोकरी किंवा निवृत्त वेतन घेत असेल तर अपात्र होईल.
  • कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर अपात्र होईल.
  • चार चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून.

अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड रेशन कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • रहिवाशी दाखला
  • बँक पासबुक
  • फोटो,इत्यादी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top