8th Pay Commission : सरकारी कर्मचारी वर्गासाठी लवकरच आनंदाची बातमी येणार, पगार एवढा वाढणार ?

8th Pay Commission : जर आपण केंद्रीय कर्मचारी असाल किंवा राज्य सरकारी कर्मचारी असाल तर आपल्याला सध्या चालू असलेल्या वेतन आयोगासोबतच लवकरच आठवा वेतन आयोग श्रेणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

२०१६ पासून देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आलेल्या होत्या त्या शिफारशी अजून पर्यंत चालू आहेत, परंतु महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे आजचे पगार हे २०१६ च्या पगाराची तुलना करता खूपच कमी दिसून येत आहेत.

वाढत चाललेल्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणी देण्यात यावी आणि वेतन वाढीच्या आधारे महागाई भत्ता सुद्धा देण्यात यावा जेणेकरून ते ज्या पदावर कार्यरत आहेत त्यानुसार त्यांना पुरेसे उत्पन्न वाढ मिळावी अशी सर्व कर्मचाऱ्यांची इच्छा आहे त्यासाठी वेगवेगळ्या कर्मचारी संघटना सरकारकडे आठव्या वेतन आयोगासाठी पाठपुरावा करीत आहेत.

आठवा वेतन आयोग कसा असेल याची आतुरता सर्वच कर्मचारी व अधिकारी वर्गांना लागलेली आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत सरकार व वित्त विभाग हा आयोग कधी लागू करतोय याची प्रतीक्षा कर्मचारी करीत आहेत. अलीकडच्या काळात त्यासंबंधी काही अपडेट्स समोर आलेले आहेत.

आर्थिक विभागाच्या काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगासंबंधी प्रस्ताव देशाच्या पंतप्रधानांनी तसेच वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजूर केले आहेत त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येऊ शकतो व त्यानंतरच आठव्या वेतन आयोगावर चर्चा केली जाऊ शकते. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार मोदी सरकार व वित्त विभागाचे अधिकारी आठवा वेतन आयोग बाबत कर्मचारी संघटनांची चर्चा करून निर्णय घेऊ शकते.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारच्या अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगासंबंधी निर्णय केलेली माहिती एक ते दीड वर्षाच्या अगोदर जारी केली जाऊ शकते कारण नियमानुसार वेतन आयोग दहा वर्षांमध्ये बदलला जातो ज्या वर्षासाठी मुख्य वर्ष २०२६ हे आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच पेन्शनधारकांना सुद्धा या आयोगाचा लाभ मिळणार आहे. पुढच्या वर्षी किंवा 2026 पर्यंत आठवा वेतन आयोग लागू झाल्यास पेन्शनधारकांना सुद्धा खूप चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. पेन्शनधारकांची सुद्धा इच्छा आहे की आठवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू व्हावा जेणेकरून पेन्शन वाढ मिळू शकेल.

आठव्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर काय असेल?

जेव्हा सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला तेव्हा १.६८ फिटमेंट फॅक्टर विचारात होता त्याच्या आधारे वेतनश्रेणीत ठरविण्यात आली होती त्याचप्रमाणे आता पुढील व्यतिरिक्त अंदाजे माहिती समोर येत आहे की १.९२ इतका फिटमेंट फॅक्टरवर निर्णय घेण्यात येऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top