7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचारी वर्गासाठी लवकरच आनंदाची बातमी येणार ? महागाई भत्ता ५४ टक्क्यांवर जाणार ……

7th Pay Commission : सरकारी केंद्रीय कर्मचारी वर्गासाठी वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता देण्यात येतो पहिला महागाई भत्ता मार्च मध्ये घोषित केला जातो तर दुसरा महागाई भत्ता ऑगस्ट महिन्यात घोषित होतो. जानेवारी ते जून या सहामाहीसाठी ४ टक्के इंतकी महागाई भत्ता वाढ करण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारी कर्मचारी वर्गाला १ जानेवारी २०२४ पासून महागाई भत्ता ५० टक्के मिळत असून या सोबत इतरही लाभ कर्मचार्यांना मिळणार आहेत.जसे डीए 50 टक्क्यांवर पोहोचल्यावर घरभाडे भत्ता (HRA) ३ टक्के वाढ होणार आहे.

सरकार सहसा दोनदा वर्षातून DA/DR मध्ये वाढ करत असते.महागाई भत्ता वाढल्याने कर्मचार्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. नरेंद मोदी सरकार या वेळेस ४ टक्के इतकी महागाई भत्ता वाढ करू शकते. परंतु अजून पर्यंत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही कदाचित सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या बाबत कर्मचारी वर्गाला आशा लागून राहिलेली आहे. जर ४ टक्के महागाई भत्त्याची वाढ झाली तर पुढीलप्रमाणे कर्मचाऱ्यांचा पगार वाढ होणार आहे.

पगार किती वाढणार आहे ….

केंद सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन रुपये १८००० आहे.

४ टक्के महागाई भत्ता वाढ झाल्यावर पगार दरमहा रुपये ७२० वाढेल. तर वार्षिक उत्पन वाढ ८६४० इतकी होईल.

जर सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन रुपये ३०००० असेल तर….

४ टक्के महागाई भत्ता वाढ झाल्यावर पगार दरमहा रुपये १२०० वाढेल. तर वार्षिक उत्पन वाढ १४४०० इतकी होईल.

जर सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन रुपये ४५००० असेल तर….

टक्के महागाई भत्ता वाढ झाल्यावर पगार दरमहा रुपये १८०० ने वाढेल. तर वार्षिक उत्पन वाढ २१६०० इतकी होईल.

महागाई भत्ता वाढ ही वर्षातून दोनदा होते.

केंद्र सरकार महागाई भत्त्यात वर्षातून महागाई दोन वेळा वाढ ही महागाई निर्देशांकाचा अभ्यास करून करीत असते. महागाई भत्त्यात होणाऱ्या वाढीचा परिणाम कर्मचार्याच्या पगार वाढीवर होत असतो. जरी महागाई भत्ता सप्टेंबर महिन्यात वाढवला तरी याचा लाभ कर्मचार्यांना जुलै महिन्यापासून मिळणार आहे.

1 thought on “7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचारी वर्गासाठी लवकरच आनंदाची बातमी येणार ? महागाई भत्ता ५४ टक्क्यांवर जाणार ……”

  1. Pingback: BMC Clerk Recruitment 2024, Apply for 1846 Vacancies :- बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लार्क पदासाठी १८४६ जागा - Maharashtra Disha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top